सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई
६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी - हिंदी नाटय स्पर्धा
(2023-2024)
ऑनलाईन प्रवेशिका नोंदणी

टिप

• दिनांक 15 नोव्हेंबर, 2023 पर्यंत हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका मागविण्यात आलेल्या आहेत.
• हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची प्रवेशिका संपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रे जोडण्यात यावीत.
• ऑनलाईन प्रवेशिका सबमिट केल्यानंतर प्रवेशिकेत भरलेली माहिती व कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल.
• प्रवेशिकेत भरलेली सर्व माहिती व जोडलेली कागदपत्रे बरोबर असल्यास आपल्या प्रवेशिकेची नोंदणी झाली असून याबाबतचा “प्रवेशिका नोंदणी क्रमांक” एसएमएस द्वारे पाठविण्यात येईल.
• प्रवेशिका नोंदणी झाली असा एसएमएस आल्यावर नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकाद्वारे लॉग ईन करून प्रवेशिकेची प्रिंट काढावी. प्रवेशिकेचे प्रिंट व डीडी मुख्य कार्यालयात किंवा विभागीय कार्यालयात जमा करावा.
• प्रवेशिकेतील माहिती चुकीची अथवा आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास प्रवेशिका अपात्र होईल.
• दिनांक 15 नोव्हेंबर, 2023 पर्यंत हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची ऑनलाईन प्रवेशिका सादर करणे आवश्यक आहे. यानंतर कुठल्याही परिस्थितीत हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची प्रवेशिका स्विकारण्यात येणार नाही.
• ऑनलाईन भरलेल्या प्रवेशिकेतील नाटक बदल करावयाचा असल्यास लेखक परवानगी, सेंन्सॉर प्रमाणपत्र, संहिता व कलाकार तंत्रज्ञ यादी दिनांक 15 डिसेंबर, 2023 पर्यंत ऑनलाईन सोबत जोडावी लागेल. दिनांक 15 डिसेंबर, 2023 नंतर ऑनलाईन प्रवेशिकेत कोणताही बदल करता येणार नाही.